1. हरीयाणा - बाबा राम रहीमला विशेष कोर्टाने ठोठावला 30 लाखांचा दंड तर दोन्ही प्रकरणांमध्ये 20 वर्षाचा कारावास
2. नवी दिल्ली - राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केला तर शेकडो तरुणांना नपुंसक केलं, डेराच्या माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट
3. नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर ओप्पो आणि विवो यांनी आपल्या 400 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले
4. नवी दिल्ली - पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या 3 वर्षांत 30 कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून या खात्यांत 65 हजार कोटी रुपये जमा - पंतप्रधान
5. नवी दिल्ली - 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार डिजिटल केल्यास प्रोत्साहन लाभाच्या स्वरूपात जीएसटीत 2 टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार
6. नवी दिल्ली - आगामी काळात कितीही किंमतीच्या सोन्याच्या खरेदी आणि विक्रीवर पॅन कार्ड अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता
7. नवी दिल्ली - प्रतिजैविकांच्या अमर्याद वापरामुळे वाढत चाललेला धोका सरकारच्या लक्षात आला असून याच्या बेसुमार वापराला चाप लावण्याचा निर्णय
8. मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफी आणि पिकविम्याची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली
9. मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ यापुढे मिळणार नाही
10. मुंबई - एसटी कर्मचारी महिलांना प्रसुती रजेसोबत तीन महिने अतिरिक्त पगारी रजा; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
11. सॅन फ्रान्सिस्को - फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रमुख मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले असून मुलीचे नाव ऑगस्ट असे ठेवले
12. मुंबई - अभिनेता अजय देवगण याच्या ‘बादशाहो’ या चित्रपटात ‘दिवार’ या चित्रपटातील ‘कह दू तुम्हे’ हे गाणे वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली
13. कॅण्डी - भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या, अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
राम रहीमला 20 वर्ष कैदेची शिक्षा व 30 लाख दंड
दोन साध्वींवर बलात्काराचा आरोपी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला सीबीआय कोर्टाने 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. दोन्ही प्रकरणांत त्याला प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू होईल. यामुळे सध्या 50 वर्षे वय असलेला राम रहीम 70 वर्षांचा होईपर्यंत तुरुंगातच राहील. दोन्ही प्रकरणांत त्याला 15-15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. त्यातून दोन्ही पीडितांना 14-14 लाख रुपये मदत दिली जाईल. डेरा या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहे.
समाजसेवक असल्याचा दावा
शिक्षा सुनावण्याआधी न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी सीबीआयच्या वकिलांनी दहा वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. ती ऐकूनच बाबा हादरला आणि स्फुंदून-स्फुंदून रडू लागला. त्यानंतर त्याच्या वकिलांनी बाबाने केलेल्या कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. रामरहीम समाजसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आणि शिक्षेत सवलत द्यावी, अशी विनंती केली; पण या युक्तिवादाचा काहीच उपयोग झाला नाही.
निकालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतरही बाबा रामरहीम रोहतक तुरुंगातील कोर्टरूममधून बाहेरच यायला तयार नव्हता. तिथेच फरशीवर तो रडत होता. त्याला पोलिसांनी खेचून बाहेर आणले आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेले. आता त्याला कैद्याचे कपडे दिले जातील आणि त्याला कोठडीत ठेवले जाईल. बाबा रामरहीमला कैदी क्रमांक 1997 दिला जाणार आहे. तीच आता त्याची ओळख असणार आहे.
राम रहीमकडे कोणते पर्याय ?
राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानले जाते. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.
राम रहीमवर आणखी 2 खटले
बाबावर आणखी दोन खटले चालू असून बलात्काराची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराचा खून केल्याप्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. डेरा मुख्यालयात 456 शिष्यांना नपुंसक केल्याप्रकरणी आॅक्टोबरमध्ये निकाल आहे.
माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट
या सर्व प्रकरणादरम्यान राम रहीमच्या माजी सुरक्षा रक्षकाने गंभीर आरोप आणि काही गौप्यस्फोट केले आहेत. ज्यात राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर शेकडो तरुणांना बाबाने नपुंसक केले. शिवाय डेऱ्यात किती लोकांच्या हत्या झाल्या, याचा हिशेब ठेवणं कठीण असल्याचे म्हटले आहे. बाबाने स्वत:च्या नावात लावलेल्या सगळ्या डिग्र्या खोट्या असल्याचंही माजी सुरक्षा रक्षकाने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment