Monday, 30 April 2018

महाराष्ट्र माझा

_*अभिमानास्पद महाराष्ट्र माझा*_

▫ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

▫ 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.

▫ महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्रात साजरे होत असलेल्या सण-उत्सवांच्या शृंखलेतील एक भव्यदिव्य असा उत्सवच आहे. हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करणे हे या पवित्र भूमीमध्ये निवास करत असलेल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

▫ संतभूमी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी थोर पराक्रमी महाराजांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे नागरिक असणे, हे आपले भाग्यच आहे. अशा पुण्यवंतांच्या महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीमध्ये कायमच सिंहाचा वाटा राहिला आहे.

▫ देशाच्या पटलावर महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की जेथे देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्तीची काही ना काही कारणास्तव येथे नाळ जोडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काय आहे, हे वेगळेपणे सांगण्याची आवश्यकताच नाही.

▫ व्यापकता हा या राज्याच्या मातीतील अलौकिक असा गुण आहे. येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करत असलेल्या परराज्यातील मंडळींनी तो आत्मसात करून आपापल्या राज्यांत महाराष्ट्रासारखी व्यापक विचारांची विचारधारा रुजवली पाहिजे.

*जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!*

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि … पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन!

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 !!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

No comments:

Post a Comment